भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी

varata venghoni ghatali udi | kalambabudin yamunesi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥ हरी बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥ भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥ तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥