भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा

varapang song nako mala mudi | thav santapadi dei deva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥ प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाहीं आणिक तें ॥२॥ नाम मुखीं सदा संतांचा सांगात । प्रेम हृदयांत विठोबाचे ॥३॥ एका जनार्दनीं हा माझा निर्धार । जन्माची वेरझार तोडी देवा ॥४॥