भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं

varushala megh khadakavaruta | chikhal na tattvata themb nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं ॥१॥ वायां तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥ अरण्यांत जैशी सुकरें बैसतीं । तैसें मठाप्रती करुनी बैसे ॥३॥ उदय होतांची लपतें उलुक । तैसें तो मूर्ख समाधि बैसे ॥४॥ एका जनार्दनीं वायां गेलें सर्व । संसार ना देव दोन्हीं शून्य ॥५॥