भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत

varnavaya rup kanhin sphurti dein | narasinh tun hoi sahyabhut

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत ॥१॥ मुख तें सिंहाचें शरीर मानवाचें । भयंकर देवाचें रूप असे ॥२॥ अनंत भूषणे जडित बाहूचीं । गळां पदकाची थाटी बहू ॥३॥ केशर चंदन लावियलें अंगा । अखंड श्रीरंगा देवाजीचे ॥४॥ नवनीत तुळशीचीं सुगंधित फुलें । माळा गुंफियले चंपकानें ॥५॥ कासे पीतांबर जडित सुंदर । कडदोरा अपार शोभिवंत ॥६॥ तोडर ब्रीदाचा विराजत भारी । आनंदला हरि नामा ह्मणे ॥७॥