भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम

lagoniyan payan vinaviton tumhala | karen tali bola mukhen nam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥ कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥ सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥