भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें । गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे

lanchavalen brahma bhakticheni sukhen | gokulin gopalaveshen gai rakhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें । गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे ॥१॥ त्रिभुवनीं न समाये ब्रम्हादिकां लक्षा नये । तो दास्यत्व करिताह गौळीयांचें ॥२॥ नवलाव गे माये देखियला । साजिरा । परब्रम्हा जालेंसे पिसें गे माये ॥४॥ निगमा निर्धारितां अमरा दर्शनाची आस । मुनिजनां ध्यानीं आभास तोही नाहीं ॥५॥ तें हें नित्य पूर्ण लाडेंकोडें खेळविती गौळणी । मा मुख चुंबन देउनी गौळणी ह्रदयीं आलिंगिती ॥६॥ क्षीरसागरींचें सुख सांडुनी अशेष । रुक्मिणी सेजेचे विलास तेहि नावडती ॥७॥ तें हें गोधना गोठणीं लोळे शुद्ध चैतन्य सांवळें । तें सुखही न कळे साचें चतुरानना ॥८॥ भक्ती प्रेम भाव देखे आहे जेथें । हरि वोरसला जाये तेथें कैचें नैश्वरत्व ॥९॥ न विचारी जातीकूळ शुची अथवा चांडाळ । ह्रदय देखुनि निर्मळ प्रीति धरी तेथें ॥१०॥ ऐसें त्रिभुवन सुखाचें सार कीं अनाथाचें माहेर । अव्यक्त परि साकार जालें असे तें ॥११॥ भक्ताचेनि वियोगें श्रमलें म्हणोनि गोकुळासी आलें । तेणें प्रेम सुख दिधलें नामयासी ॥१२॥