भजनी मालिका
← भजनांकडे परत

लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें

lavan melavitan jalen | kay uralen niralen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥ तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥ अग्नीकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥ तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥