भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें

launi managanichi dori viparit tayachi kusari | akalun na kale shrihari | avaghe vodambar tujhen

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥ अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥ तेथ रात्र दिवस नेणिजे । सोहं प्रकाश सहजे । नाचविसी पंचभूतें वोजे । कवतुक तुझें तूं पाहसी ॥२॥ भानु निसियेचा कुवासा । येक राहिले याचिये आशा ॥ येक ह्मणति अढळ धुरु कैसा । तयाचा भरंवसा त्यासिं नाही ॥३॥ ऐसीं तयाचीं बोलणीं । अंगीं राहिलीं खेळणीं । साही पावटणी करुनि । सातावरि घातु मांडिला ॥४॥ करीं घेऊनि आळवणी । करु नेणें वोवाळणी । बाप रखुमादेविवरा विठ्ठला चरणीं । चौघी जणी निमालिया ॥५॥