भजनी मालिका
← भजनांकडे परत

रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी

rojakirda jama dharuni sakal | khatavila kal varavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रोजकीर्द जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥ चोरासाटीं रदबदल आटटहास्य । जळो जिणे दास्य बहुताचें ॥२॥ सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥