भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूप हें सावंळे भोगिताती डोळे

rup hen savanle bhogitati dole

रूप हें सावंळे भोगिताती डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥ पदरज वंदी ध्यान हें गोविंदी । उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥२॥ विदुक्र सुखाचा नाम स्मरे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥ निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठें ॥४॥