भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुपाचें रुपस नाम ह्रषिकेश । पंढरी निवास जप करी

rupachen rupas nam hrashikesh | pandhari nivas jap kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रुपाचें रुपस नाम ह्रषिकेश । पंढरी निवास जप करी ॥१॥ विठ्ठल श्रीहरी मुकुंद श्रीहरी । नामेंचि बोहरी प्रपंचाची ॥२॥ विठठल नामामृत हेंचि जीवन होत । नाम हें मुखांत केशवाचें ॥३॥ नामा म्हणजे देव अमृताचा लाठा । मुखामाजी पेठा होत नामें ॥४॥