भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि

rup nanv maya bolavaya thav | bhaga ale bhav tayapari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥ पोटा आलें तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥ तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥