भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड

rusalon ahmin apuliya sanvasara | tethen janachara kay pad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥३॥ तुका म्हणे करा ठाकेल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥