भजनी मालिका

भजने

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥ प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तिभावार्थे अर्पिलें । देवें आपनापाशीं ठेविले ॥१॥ नेदी कोणाचिये हातीं । भक्तावाचुनी निश्चितीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥ एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१॥ काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥ नसावे जी तुह्मी कांहीं निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्ती तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रम्हा तनु ॥१॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तीं देवातें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥१॥ ऐसें भजती येरयेरां । जैसें जळ आणि जळगारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम