भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं

bhaktivin pashu kashasi vadhala | satavinen nela kaisa nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१॥ काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥ पातके करितां पुढें आहे पुसतां । काय उत्तर देता होशील तुं ॥३॥ अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥ एका जनार्दनीं सांगताहे तोंडे । आहा वांचा रडे बोलताची ॥५॥