भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिभावार्थे अर्पिलें । देवें आपनापाशीं ठेविले

bhaktibhavarthe arpilen | deven apanapashin thevile

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तिभावार्थे अर्पिलें । देवें आपनापाशीं ठेविले ॥१॥ नेदी कोणाचिये हातीं । भक्तावाचुनी निश्चितीं ॥२॥ जुनाट जुगादींचें । ठेवणें होतें ते संतांचें ॥३॥ पुंडलिकें करुनी वाद । ठेवणें केले तें प्रसिद्ध ॥४॥ नेदी म्हणोनि उभा केला । एका जनार्दनीं अबोला ॥५॥