भजनी मालिका

भजने

भगवद्भाव सर्वांभुतीं । हेंचि ज्ञान हेंचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नावें ॥१॥ हें सांडुनीं विषयध्यान । तेंचि मुख्यत्वें अज्ञान । जीवींजीवा बंधन । येनेंचि दृढ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥ वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भजतां भजन एका जनार्दन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एका ॥१॥ सांडुनी वासना भजतां भजन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भजन करितां लाजतो पामर । संसारीं चित्त स्थिर सदा वाहे ॥१॥ तीर्थयात्रे जाये संसार चिंता वाहे । पुराण कीर्तनीये निद्रा बळें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भजन तें साचें भोळ्या भाविकासी । पैं अभाविकासी नरकवास ॥१॥ भोळियाचा देव अंकित भोळा । अभाविका चांडाळा जवळीं नसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया ॥१॥ नीचानीच मीच एकु । मजवरी उपवरी वर्ते सकळ लोकु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें पाहूं विठोबासी ॥१॥ भजन तें सोपें भजन तें सोपें । हरतील पापें जन्मांतरींची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम