भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं

bhaktipremavin dnyan nako deva | abhiman nitya nava tayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥ प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥ रांगवेनें जेवीं शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥