भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रम्हा तनु

bhakti ten naman vairagya to tyag | dnyan brahmin bhog bramha tanu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रम्हा तनु ॥१॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥ उदक अग्नी धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥ तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥