भजनी मालिका

भजने

भक्तांची आवडी मोठी त्या देवासी । सद्‌भक्तिप्रेमासी लांचावला ॥१॥ काय सांगूं आतां तयांचें तयांचें कौतुक । जेथें ब्रह्यादिक स्तब्धा ठेले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तांचें तें साह्या करणें पांडुरंगा । म्हणोनि तीर्थगंगाअ उगविलें ॥१॥ जान्हवी मंदाकिनी भोगावती मिळुनी । दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । तें न साहवे भगवंता ॥१॥ करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तांवीण देवा कोण । सोयरा सज्जन तिहीं लोकीं ॥१॥ यालागीं त्यांचीच वास पाहे । आज्ञेंत राहे भक्तांचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तांवीण देवालागीं । पुसतें जगीं कोण दुजें ॥१॥ नामहि नव्हतें रुपहि नव्हतें । कैसेंनि जाणतें कोण तया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव