भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर

bhakti ton kathin shulavaril poli | nivade to bali virala shur

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥ तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥