भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु

bhaktichiya potin ratnachiya khani | bahminchi thevani sakal vastu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥ जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥ सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥ आदिअंत ठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे जग उच्चांसनी ॥४॥ भावारूढ तुका झाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥ भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥ ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वर्णु आतां सांगणें तें किती । कोटि ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥२॥ राही रखुमाई दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥ तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥