भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता

bhaktianchiya manobhava | sarikhe deva tumhi varta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तिांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥ आवडीचा न करा भंग । अंतरंग म्हणोनियां ॥२॥ धर्माघरीं उच्छिष्ठकाढा । अर्जुना पुढा सारथ्य ॥३॥ निळा म्हणे बळीच्या व्दारीं । होउनी भिकारी भीकमागा ॥४॥