भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिभावें बळे गा देव महाराज पंढरिराव

bhaktibhaven bale ga dev maharaj pandharirav

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भक्तिभावें बळे गा देव महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें। संतजनीं भेटावें ॥२॥ भक्ति आहे ज्याचे चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥ भाव धरा मनीं । म्हणे नामयाची जनी ||४||