भजनी मालिका

भजने

परेहूनी कैसें पश्यन्ती वोळलें । मध्यमीं घनावलें सोहंबीज ॥१॥ वैखारियेसी कैसें प्रगट पैं जालें । न वचे ते बोल एकविध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥१॥ अच्युत श्रीहरी केशव नरहरी । माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पळ पळ आयुष्य खातसे काळ । कां रे होसी सबळक पोसणा तूं ॥१॥ वाढविसी देह काळाचें भातुकें । कां रे तुज कौतुकें सुख वाटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसें बोलतसे श्रुती । पाहे पां जना ॥१॥ वेदशास्त्रा पुराण । महिमा संतांचाचि जाण । शुकादिक रंगून । रंगले रंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पळवाया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग । श्रवापदांचे कोंडले तुंग । मृग व्याघ्रें कालवती ॥१॥ वृकवराह पंचानन । ससे जंबुक सामर भेवन । रानम्हैसे रोही हरिण । जीव धाकें मिसळति ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणें घडें जाण सर्व कर्म ॥१॥ वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दीपेंविण मनोहर । शोभा व पवे ॥१॥ श्यामअंगीं तरुणी । सुंदर होय रम-णी । पुरुषाविण कामिनी । शोभा न पवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥ धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जेजेकार हरी हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम