भजनी मालिका
← भजनांकडे परत

पळवाया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग । श्रवापदांचे कोंडले तुंग । मृग व्याघ्रें कालवती

palavaya na dise marga | pakshi jalatati bhujang | shravapadanche kondale tung | mrug vyaghren kalavati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पळवाया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग । श्रवापदांचे कोंडले तुंग । मृग व्याघ्रें कालवती ॥१॥ वृकवराह पंचानन । ससे जंबुक सामर भेवन । रानम्हैसे रोही हरिण । जीव धाकें मिसळति ॥२॥ ज्वाळा लागती आकाशीं । धूम्रें कोंडिले रवि शशी । वृक्ष जळताती तेणें त्यांसी । तडक फुटती सर्वांगी ॥३॥ प्रचंड वाताचिया लोरी । तुटती तेणें गगनोदरी । शिखा आंदोळती अंबरी । तेणें फडत्कार वाजति ॥४॥ देखोनिया भ्याले सकळ । गवगविले अवघे गोंवळ । म्हणति आला अंतकाळ । गाईगोधनांसमवेत ॥५॥ ठिणगिया उडती असंख्यात । इंगळ येऊनी पडती आंत । आतां कैचा गोकुळप्रांत । मार्गचि नाही पळावया ॥६॥ निळा म्हणे घालिती कंठी । येर येरांचिया धांवोनि मिठी । हें देखोनियां तो जगजेठी । म्हणे रे कोणी भेऊं नका ॥७॥