भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणें घडें जाण सर्व कर्म

pavitra antar shuddha kar man | tenen ghaden jan sarva karma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणें घडें जाण सर्व कर्म ॥१॥ वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥ यज्ञादिक कर्में घडतां सांग । मी मी संसर्ग घडतां वायां ॥३॥ दानधर्मविधी धरितां शुद्ध मार्ग । मी मी म्हणतां याग वायां जाय ॥४॥ एका जनार्दनीं मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्वफळ ॥५॥