भजनी मालिका
← भजनांकडे परत

पलंगीं नारी वैसवूनि । माये हातीं वाहे पाणी

palangin nari vaisavuni | maye hatin vahe pani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पलंगीं नारी वैसवूनि । माये हातीं वाहे पाणी ॥१॥ ऐसा कलियुगीं आचार । क्रिया भ्रष्ट झाले नर ॥२॥ स्त्रीसी पाटावाची चोळी । माता सिवती सोंवळीं ॥३॥ स्त्रियेचा कै-वार वोढी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥४॥ स्त्रीचें ऐकोनि उ-त्तर । सख्या बंधूसि पाडी वैर ॥५॥ म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगाचा महिमा ॥६॥