भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दीपेंविण मनोहर । शोभा व पवे

pavitra ani parikar | ubhavilen mandir | dipenvin manohar | shobha va pave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दीपेंविण मनोहर । शोभा व पवे ॥१॥ श्यामअंगीं तरुणी । सुंदर होय रम-णी । पुरुषाविण कामिनी । शोभा न पवे ॥२॥ द्रव्यावि ण नर । जरी जाहला सुंदर । तो त्यावीण चतुर । शोभा न पवे ॥३॥ गिया आणि कठीन । इंद्रिया नाहीं दमन । षट्‍कर्मेंविण ब्रह्मज्ञान शोभा न पवे ॥४॥ नामा ह्मणे सुंदरा । रखुमादेवीवरा । तुजविण दातारा । शोभा न पवे ॥५॥