भजनी मालिका

भजने

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२

रचनाकार: संत एकनाथ

परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥ चारी वाच तय सदोदित गती । पुराणें भाडती अहोरात्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पराचे ते दोष आणू नये मनीं । जयाची ते करणी त्याजसवें ॥१॥ विषाचिया अंगी नोहे अमृतकण । मारकक तें जाण विष होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे । परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥ वेदविहितासी न पाडी अंतर । लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । आम्हां जोडला वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्य शेवटीं देह तैसा ॥१॥ घदिघडी काळ वाट याची पाहे । अझुनि किती आहे अवकाश ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परियेसी रुक्माई जैसा बैसला पाटीं । दैन्य पैं न सोडी काय करूं ॥१॥ सदैवाच्या स्त्रिया अलंकारमंडित । मजवरी नाहीं प्रीत काय करूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव