भजनी मालिका

भजने

पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षीना ॥१॥ धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद तें प्रेम असो द्यावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झालीं तयां ॥१॥ माडया उपरमाडया बैसती बैसणीं । नाना अलंकार लेणीं झाला कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पशु पक्षी श्वापद याती । भृंग पतंग कीटक जाती ॥१॥ हरीतें भजतां हरिरुप झालीं । निजानंदी निमग्न ठेलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥ तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका । पाहिल्या सकळिका मोक्षपुर्‍या ॥१॥ पंथीं पावन तीर्थें करुनि सकळिकें । प्रक्षाळलीं पातकें वासनेचीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पहा ऋषि आले मागावया दान । शांति करुं यज्ञ ऋषीचिया ॥१॥ ऋषीलागीं पूजा सिद्धि नेऊं पैजा । राक्षसांच्या फौजा मारुं बळें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥ नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥ निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव