भजनी मालिका

भजने

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या ॥१॥ न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा । बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥ भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥ करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥ काया कष्ट नको कांहीं । देश विदेशासी न जाई निवांतची ठायीं । बैसोनिया जपे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान ॥१॥ दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठ । पुढिलांसी वाटा यम-पंथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट ॥१॥ प्रपंचीं कर्दमीं गढोनियां ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाही भजन पूजन केलें । पूर्वी हें आलें स्वानुभवा ॥१॥ तुम्ही अव्हेरिलें देवा । करितां धांवा नाईका ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥ म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा