भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी

nahi namasi sadhan | nirahar na uge uposhan | nako dandan mundan | sukhe vache athavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥ काया कष्ट नको कांहीं । देश विदेशासी न जाई निवांतची ठायीं । बैसोनिया जपे ॥२॥ नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एका जनार्दनीं नाश । नको करूं शरीराचा ॥३॥