भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं प्रेमभाव नकळे मान्यता

nahin premabhav nakale manyata

रचनाकार: संत बंका · अभंग
नाहीं प्रेमभाव नकळे मान्यता । सलगी बोलतां सुख वाटे ॥१॥ अखंड नामावळी गाईन वेळोवेळीं । नित्य ती दिवाळी आम्हांघरीं ॥२॥ संतसमागम वैष्णवांचा हाट । पंढरीये पेठ दुमदुमली ॥३॥ वंका म्हणे सुख तयाचे संगंती । बैसेन पंगती हरिदासा ॥४॥