भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं त्या उरलें दुजें कृष्णविण

nahin tya uralen dujen krushnavin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं त्या उरलें दुजें कृष्णविण । ब्राह्य अंत:करण कृष्ण झाला ॥१॥ जीवाचाही जिव शिवाचाही शिव । देहीं देहभाव कृष्ण झाला ॥२॥ शब्दा शब्दविता बोधा बोधविता । चित्ता चेतविता झाला कृष्ण ॥३॥ निळा म्हणे कृष्णें केलें कृष्णाकार । सबाह्य अंतर रंगविलें ॥४॥