भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये

nahin mhanatan avaghen tenchi | ahe mhanatanchi davitan naye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥ म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥ डोळा देखणा देखे सर्व । न देखे बरव आपुली तो ॥३॥ निळा म्हणे तेवीं जाणों जातां । जाणणेंचि तत्त्वतां वस्तु होये ॥४॥