भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं माझा उरविला । संदेह अवघाचि फेडिला

nahin majha uravila | sandeh avaghachi phedila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं माझा उरविला । संदेह अवघाचि फेडिला ॥१॥ म्हणोनियां त्याच्या सुखें । नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥२॥ बोलविती जें जें वाचें । तें तें अक्षर निश्चयाचें ॥३॥ निळा म्हणे मी नेणें गति । अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥