भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु

nahin tya acharu sonvila parivaru

नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु । गोकुळीं साचारु अवतरला ॥ १ ॥ गाई चारी हरी गोपवेष धरी । नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥ २ ॥ ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें । योगियांची मनें हारपति ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं । अवतार गोकुळीं घेतलासे ॥ ४ ॥