भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं

nahin mi magat anikachen kanhin

नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं । आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥ समर्थ म्हणोनी धरितों पदरा । वाउगा पसारा दाऊं नको ॥२॥ ब्रीद बांधिलें कासया चरणीं । तें सोडी चक्रपाणी पांडुरंगा ॥३॥ कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण । नको निर्वाण करूं आतां ॥४॥