भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची

nahin devachiye dvarin adakathi | he to ahe goshti siddhantachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥ भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥ नामा म्हणे ऐसा लौकिक वेव्हार । तेथें तों निर्धार कांहीं नाहीं ॥३॥