भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं भिन्नत्व उरलें । अवघ्या अंगें अवघें झालें

nahin bhinnatva uralen | avaghya angen avaghen jhalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं भिन्नत्व उरलें । अवघ्या अंगें अवघें झालें ॥१॥ नेणती ते मानामान । जन तैसें तयां वन ॥२॥ न लगे साधन त्या संपत्ती । देवचि झाले सर्वा भूतीं ॥३॥ निळा म्हणे एकाएकीं । एकचि होऊनि ठेले लोकीं ॥४॥