भजनी मालिका

भजने

तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥ बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ । दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल ॥१॥ आकांतीं द्रौपदीयें स्मरिला । तिचीं वस्त्रें आपणचि झाला । सभेमाजी मान रक्षिला । काळ पैं झाला कौरवांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥ करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तो या साच भाव न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥१॥ घाली मेघ धारा कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंध कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तोंचि हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥ नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तोंडभरी विवेक मनीं वाहे अभिलाख । विवेक केला रंक विषयाचा ॥१॥ वैराग्याविण ज्ञान बोलती तें उणें । घरोघरीं पोसणें लाविताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ