भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोचि वणिती आनंद । परमानंद अंतरींचा

tochi vaniti anand | paramanand antarincha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तोचि वणिती आनंद । परमानंद अंतरींचा ॥१॥ जनीं लावावया गोडी । कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥ आपण पावोनियां सुखा । आणिकां हरिखा मेळविती ॥३॥ लिध्हा म्हणे निगमादिक । ज्याचें कौतुक वानिती ॥४॥