भजनी मालिका

भजने

तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको ॥१॥ असे घराश्रमीं भजे सर्वांभूतीं । मी माझें पुढतीं म्हणों नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तोंवरी रे तोंवरी वैराग्याचें ठाण । जंव कामिनी कटाक्ष बाण लागले नाहीं ॥१॥ तोंवरी रे तोंवरी आत्मज्ञान बोध । जोंवरी अंतरीं कामक्रोध उठले नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्या हरीदासांची भेटी घेतां । नरका उभयतांसी जाणे ॥१॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥ भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ॥१॥ शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥ घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वायां जाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्यागेंवीण विरक्ति । प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां ज्ञप्ति । शोभा न पवे ॥१॥ दमनेंवाचूनि यति । मानाविण भूमि-पति । योगि नसतां युक्ति । शोभा न पवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥ येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥ नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा