भजनी मालिका

भजने

त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥ वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥ तेथे माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोसे ॥ध्रु.॥ चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥ खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

त्याजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥ आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तोचि देईल तें खावें ॥१॥ न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥ जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥ ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्राहे त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥ एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥ सोपें सोपेंक जपा आधीं रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिकूट शिखरावरी पाहे पां नवल । परी अखंडित धार वर्षे अमृताची ॥१॥ त्रिवेणीसंगमीं गगन निर्मळ वाहे । तेथें स्नान करूं जाय आनंदमय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥ दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥ कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥ पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ