भजनी मालिका
← भजनांकडे परत

तैसे तुमच्या योगें थोर । आम्ही पामर जीवजंतु

taise tumachya yogen thor | amhi pamar jivajantu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तैसे तुमच्या योगें थोर । आम्ही पामर जीवजंतु ॥१॥ गाऊं वानूं तुमच्या गुणा । तेणें भूषणा वाढलों ॥२॥ कस्तुरीसंगे मृतिका जैसी । विकें कनकेसी समान ॥३॥ निळा म्हणे पुरुषोत्तमा । अपार महिमा हा तुमचा ॥४॥