भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला

tochi latikyamaji bhala | mhane dev myan dekhila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंध कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥ आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां तया मूढा ॥२॥ आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥३॥