भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो या साच भाव न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा

to ya sach bhav na kale chi indra | mhanauni dhara ghali megha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तो या साच भाव न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥१॥ घाली मेघ धारा कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥ देखती पाऊस वोवळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥ विचारी पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥ लागलेंसे गोड न कळे त्या काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥ आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥ यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥