भजनी मालिका
← भजनांकडे परत

तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें

taishinch vatsen jichi jesin | hotin houni thela taisin | bandin khairin mori jambulasin | tambadi dhavali kapilavanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥ बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥ देखतां गांईसी फुटे पान्हा । घरींचिया लोभ उपजे मना । ऐशीं स्वरुपें होउनी नाना । खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥ येदनी ब्रम्हा पाहे डोळां । तंव पहिलिया ऐसाचि सोहळा । ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविलीया ऐसाचि सोहळा ॥४॥ शिंग काहाळा मोह्या पावे । गोवळ नाचतातीं सुहावे । वरी धरुनियां चांदिवे । भोवती खिलारें वत्सांची ॥५॥ ब्रम्हा म्हणे आणिलीं केव्हा । म्यां तों लपविलीं होती एकिसवा । जाऊनियां पाहे तंव तो मेळावा । जेधिल तेथें तैसाचि ॥६॥ निळा म्हणे लाविलें पिसें । ब्रम्हया येण्याजाण्याचाचिी वळसे । मग लज्जित होऊनियां मानसें । करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥