भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ । दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल

to dev smarare anant | jo kan vaikunthincha nath | drudh dhara re hladayant | tenen yamapanth chukel

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ । दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल ॥१॥ आकांतीं द्रौपदीयें स्मरिला । तिचीं वस्त्रें आपणचि झाला । सभेमाजी मान रक्षिला । काळ पैं झाला कौरवांचा ॥२॥ विमळार्जून उन्मळिला । जरासंध तोही मारिला । कंसासूर निर्दाळिला । कान्हया झाला गोकुळींचा ॥३॥ ध्रुव जेणें अढळपदीं बैसविला । नामें एके अजामिळ उद्ध-रिला । उत्तरेचा गर्भ रक्षिला । तैं सोडविला परीक्षिती ॥४॥ जाति कुळ न पाहसी । नामें एकें उद्धरिलें गणिकेसी । त्या गोपाळाचें उच्छिष्ट खासी । गज सोडविसी पाणियाडें ॥५॥ ऐसा तूं कृपाळु गा देवा । प्रसन्न झालसि पांडवा । विष्णुदास नामा विनवी केशवा । प्रेमभाव द्यावा मजलागीं ॥६॥